Sunday, January 31, 2010

हे महात्म्या...


तुला टाळले संबोधनातून,
तुला गाळले इतिहासातून,
जाळले मृतदेह,
विचारांचा
गर्भपात केला.
तरीही...
तू उरलास.

तुजे ओझे वाहतोय
वर्षानुवर्षे.
निर्बुदधाप्रमाणे.

"धर्म तोड़ता नही जोड़ता है!"
खर आहे.
स्वार्था साटी धर्म जोड़ता येतो,
जाती वाटता येतात
माणसे मारता येतात,
हे सारे, तुझ्याच देशाने शिकवले.

"अहिंसा परमो धर्म:"
म्हणणाऱ्या महात्म्या...!

ऐकतोयस् ना तू हे उदध्वस्त स्वर!


-किशोर

ते आणि आम्ही


त्याना पहावले नाहीत आमचे अश्रु .

मग...
त्यानी राजीनामे दिले,
खान्देपालट केली,
निषेधाचे फलक झलकावले.

त्यानी श्रदांजली सभा घेतल्या,
त्यानी नुकसान भरपाईचे वायदे केले,
रुग्णालयाना भेटी दिल्या,
नक्राश्रू ढालले.

उच्चस्तरावर तपास
अन्
निचस्तरावर राजकारण झाले .
...

मात्र
आम्हाला
जगावेच लागते
खांद्यावर घेऊन
आमचे कलेवर .

- किशोर

भिंत बांधतोय आम्ही...

अनादी कालपासून...
एकच एक, अखंड.
खोल खोल पार पातालापर्यंत,
खनलाय पाया.
भरला जातोय तो,
रोज़ नव्या ताज्या मुडदयांनी;
भिंत बांधतोय आम्ही.

उभ्या आडव्या पसरलेल्या माझ्या देशात
टाकतोय उभे आडवे धर्माचे बिम
जाती - पोटजातीच्या विषाचे रबित
घट्ट करतेय भाषा - प्रान्तवादाची एकेक विट.
आमचे कार्यक्षम हात
मदत करतायेत आम्हालाच चिनण्यास;
भिंत बांधतोय आम्ही.


बांधकाम करणारे हात
रोवतायेत आपापले झेंडे
कोरतायेत नाममुद्रा मध्ये मध्ये;
रोज नवे हात,
नवे झेंडे,
भिंत वाढत चाललीय झपाट्याने...
नद्या, नाले, जंगले दुभागत
भिंत आता उभी ठाकलीय
चन्द्र, सूर्य, तारयामधे
आकाशाचीही फालनी करत
भिंत बांधतोय आम्ही.
भिंत
बांधतोय
आम्ही...

- किशोर